आहाराची करा योग्य पडताळणी

आपण भारतीय ‘एका थाळीत संतुलित जेवण’ या तत्त्वाचा अवलंब करत आलो आहोत. चौरस आहार घ्यायचा, अशी शिकवण लहानपणापासून मिळते; पण आजकालच्या व्यग्र जीवनशैलीत फास्ट फूड आणि तत्सम सोयीस्कर अशा पदार्थांचा समावेश केला जातो. ज्यात शरीरास पोषक असणाऱ्या घटकांची कमतरता असल्यानं थकवा जाणवणं, शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होणं अशा आरोग्य समस्या डोकं वर काढताना दिसतात.

नमिता जैन

क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अँड वेट मॅनेजमेंट एक्स्पर्ट

काही मंडळी वजन कमी करण्यासाठी किंवा सुदृढ आरोग्यासाठी हमखास डाएट करतात; पण डाएटचा खरा अर्थ अनेकांना माहिती नसतो. तसंच, कोणत्या पदार्थांचं सेवन करावं? कोणत्या पदार्थांमध्ये किती पोषणमूल्यं असतात? आहाराचं किती वेळा सेवन करावं आणि किती प्रमाणात सेवन करावं? ताणतणावात काय खावं, असे अनेक प्रश्न पडतात. आहाराविषयी काही गैरसमजही प्रचलित आहेत. जिकिरीनं डाएट केलं म्हणजे वजन आपोपाप कमी होतं, या गैरसमजातून आरोग्यावर विपरीत परिणाम करून घेतलेले किंवा अशक्तपणाला आयतंच आमंत्रण दिलेली अनेक मंडळी आजूबाजूला दिसतील. मग त्यासाठी वेगळा पैसा खर्च करून डॉक्टरांच्या पायऱ्या चढाव्या लागतात. आजच्या लेखातून आहाराविषयी असलेल्या शंकाचं निरसन करू या.

कपडे आणि फॅशन यासारखंच पदार्थांमध्येही नवनवे ट्रेंड पाहायला मिळतात. आरोग्यासाठी उत्तम असणाऱ्या पदार्थांना त्यांच्यात असणाऱ्या आरोग्यवर्धक गुणांमुळे जास्त मागणी असते. गोल्डन मिल्क, चिया, मॅचा, माका, स्पिरुलिना, मोरिंगा, ककाओ, गोजी बेरी, केफी, कोंबूचा यांसारख्या भाज्या, फळं आणि खाद्यपदार्थ त्यांच्यात असणाऱ्या आरोग्यदायी गुणांसाठी ओळखले जातात. खाद्यपदार्थांच्या जास्तीत जास्त खपासाठी शाकाहार, ग्लूटेनमुक्त, लॅक्टोजमुक्त यांसारख्या वैशिष्ट्यांचा वापर केला जातो. तुम्हाला गव्हातील ग्लुटेन आणि दुधातील लॅक्टोजची अॅलर्जी असेल, तर तुम्ही स्वतःच्या आरोग्यासाठी योग्य असणाऱ्या पदार्थांचाच समावेश आहारात करायला हवा.

आपण भारतीय ‘एका थाळीत संतुलित जेवण’ याचा अवलंब करत आलो आहोत. चौरस आहार घ्यायचा, अशी शिकवण आपल्याला लहानपणापासून मिळते; पण आजकालच्या व्यग्र जीवनशैलीत फास्ट फूड आणि तत्सम सोयीस्कर अशा पदार्थांचा समावेश केला जातो. ज्यात शरीरास पोषक असणाऱ्या घटकांची कमतरता असल्यानं थकवा जाणवणं, शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होणं अशा आरोग्य समस्या डोकं वर काढताना दिसतात. गरजेपेक्षा जास्त आणि अयोग्य डाएट केल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर विपरीत परिणाम होतो. लोकांना नैसर्गिक आणि त्वरित ऊर्जा मिळवून देणारे खाद्यपदार्थ आवडत असतात, लोकांच्या याच मागणीचा वापर विक्रेते अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या विक्रीसाठी करतात.

आहाराची करा योग्य पडताळणी

शरीराचा बांधा योग्य ठेवण्यासाठी योग्य आहार खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. आजकाल आरोग्यकेंद्रांचं प्रमाण वाढलं आहे. सोबतच आहार कसा असावा या प्रश्नाचं उत्तर देणारे बरेच स्वघोषित तज्ज्ञ मंडळी तुम्हाला भेटतील. त्यामुळे तुमची द्विधा मनस्थिती होऊ शकते. त्यामुळे त्यांचे शिक्षण, योग्यता, विश्वसनीय तपासून त्यांचा डाएट घ्यायचा की नाही ते ठरवा. यासाठी तुमची निरीक्षणशक्तीच कामी येते. उगाचच नेटवर शोधून डाएटिशन निवडू नका, त्यासाठी अभ्यास करा. आणि निरोगी शरीराचे योग्य ‘रिझल्ट’ हवे असतील, तर जबाबदारीनं डाएटिशनची निवड केली गेली पाहिजे. त्यांचे खरे ‘रेटिंग्ज’ तपासा.

फायदे

० आरोग्यासाठी फायदेशीर.

० लवकर पचन.

तोटे

० अतिशयोक्तीमुळे नुकसान होऊ शकतं.

० सर्वच प्रकारच्या शरीरयष्टीस उपयुक्त नाही.

० अतिसेवन करणं शरीरास हानिकारक.

० सकारात्मक परिणामांचं प्रमाण कमी.

तज्ज्ञांचं मत

तुमच्या शरीराला प्रथिनं, जीवनसत्त्वं, खनिजं याची आवश्यकता असेल, तर डॉक्टर तुम्हाला आहारात ठरावीक पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला देतात. काही खाद्यपदार्थांमध्ये शरीराला भरपूर ऊर्जा मिळवून देण्याची क्षमता असते. हे खरं आहे, की नैसर्गिक खाद्यपदार्थ हे प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांहून अधिक पौष्टिक असतात; पण काही नैसर्गिक पदार्थांमध्ये ‘सिडा कॉर्डीफोलिया’ हा घटक असतो, जो एफेड्रीन अल्कलाइडचा वनस्पती स्रोत आहे. अशा पदार्थांचं सेवन करण्यापूर्वी रक्तदाब, हृदयरोग असणाऱ्या व्यक्तींनी एकदा वैद्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

ताजं अन्न, पूर्णान्न, ऋतूनुसार येणारे खाद्यपदार्थ, नैसर्गिक स्वरुपातील पदार्थ हे सर्व आपल्या शरीराला मुबलक प्रमाणात ऊर्जा देतात; पण त्याचं योग्य प्रमाणात सेवन करणंही तितकंच आवश्यक आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *